---Advertisement---
जळगाव जिल्हा राजकारण

अखेर लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला ; जळगावातील दोन्ही जागेवर या दिवशी होणार मतदान?

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मार्च २०२४ । संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा अखेर जाहीर झाल्या असून त्यानुसार देशात एकूण सात टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया 19 एप्रिलला पार पडेल तर शेवटच्या टप्प्यातील मतदान 1 जून रोजी होणार आहे. त्यानंतर 4 जून रोजी मतमोजणी होणार असून त्याच दिवशी निकाल लागणार आहे. निवडणूक आयोगाच्या या घोषणेनंतर देशभरात आजपासूनच आचार संहिता लागू झाली आहे.

WhatsApp Image 2024 03 16 at 3.24.56 PM jpeg webp

दरम्यान, महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान करण्यात येणार असून महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातील निवडणूक २६ एप्रिलला पार पडेल. तर जळगाव आणि रावेर मधील निवडणूक चौथ्या टप्प्यात १३ मेला पार पडेल.

---Advertisement---

महाराष्ट्रात मतदान कधी आणि कुठे ?
पहिला टप्पा – 19 एप्रिल – रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर
दुसरा टप्पा 26 एप्रिल – बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी
तिसरा टप्पा 7 मे – रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले
चौथा टप्पा 13 मे – नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड
पाचवा टप्पा 20 मे – धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ

सात टप्प्यात मतदान
पहिला टप्पा – 19 एप्रिल
दुसरा टप्पा – 26 एप्रिल
तिसरा टप्पा – 7 मे
चौथा टप्पा – 13 मे
पाचवा टप्पा – 20 मे
सहावा टप्पा – 25 मे
सातवा टप्पा – 1 जून

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---