⁠ 
रविवार, सप्टेंबर 8, 2024
Home | जळगाव जिल्हा | आज महाराष्ट्रातील 19 जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट ; जळगावात कशी राहणार स्थिती?

आज महाराष्ट्रातील 19 जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट ; जळगावात कशी राहणार स्थिती?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १० मे २०२४ । गेल्या काही दिवसापासून राज्यातील बहुतांश जिल्ह्यात तापमानात मोठी वाढ झाल्याने असह्य करणाऱ्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहे. यातच राज्यातील अनेक भागात मान्सूनपूर्व पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर हवामान खात्याकडून राज्यातील १९ जिल्ह्यात पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज जळगाव जिल्ह्याला कोणताच अलर्ट जारी करण्यात आला नाहीय. मात्र येत्या १२ मेला पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

या १९ जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट
आज हवामान विभागानं राज्यातील १९ जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे. यामध्ये पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, अकोला, भंडारा, बुलढाणा चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि वर्धा यांचा समावेश आहे. अमरावती आणि नागपूरमध्ये आज वीजांच्या गडगडासह मुसळधार अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तविला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस होण्याची शक्यता आहे.

उद्या ११ मेला या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट
११ मे रोजी अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, पुणे, सातारा,छत्रपती संभाजीनगर, बीड, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

१२ मे जळगावसह २८ जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, गुरुवारी सायंकाळी जळगाव जिल्ह्यातील काही भागात वादळी पावसाने हजेरी लावली. यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. मात्र या पावसाने उकाड्यापासून किंचित दिलासा मिळाला.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.