ब्रेकिंग : जळगावात 6, तर रावेरातून 5 उमेदवारांची माघार ; दोन्ही मतदार संघातील लढतींचे चित्र स्पष्ट

एप्रिल 29, 2024 5:55 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ एप्रिल २०२४ । जळगाव जिल्ह्यातील रावेर आणि जळगाव लोकसभेसाठी अर्ज माघार घेण्याचा आज (दि २९)चा शेवटचा दिवस आहे. दरम्यान, माघारीच्या अंतिम दिवशी जळगाव लोकसभा मतदारसंघात सहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली. तर रावेरातून पाच अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली. यानंतर आता जळगाव लोकसभेमध्ये एकूण १४ तर रावेरमधून २४ उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात असून दोन्ही मतदार संघातील लढतींचे चित्र स्पष्ट झाले आहे.

loksabha election jpg webp

सध्या जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या प्रचाराला वेग आला आहे. १३ मे रोजी जळगाव आणि रावेरमधील निवडणूक पार पडणार आहे. दरम्यान, जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना अर्ज माघारी घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. माघारीच्या अंतिम दिवशी जळगावमधून सहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली आहे. यानंतर आता जळगाव लोकसभेत भाजपच्या स्मिताताई वाघ, शिवसेना ठाकरे गटाचे करण पवार यांच्यासह एकूण १४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. जळगाव लोकसभेतून संजय एकनाथ माळी, रोहित दिलीप निकम, लक्ष्मण गंगाराम पाटील, डॉ. प्रमोद हेमराज पाटील, संग्रामसिंह सुरेश सूर्यवंशी व प्रदीप शंकर आव्हाड या अपक्ष सहा उमेदवारांनी माघार घेतली आहे.

दुसरीकडे रावेर लोकसभेमधून पाच उमेदवारांनी माघारी घेतली आहे. यामुळे आता येथून भाजप उमेदवार रक्षा खडसे, महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील व बहुजन समाज पार्टी या तीन प्रमुख पक्षांच्या उमेदवारांसह एकूण 24 उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात असल्याचं स्पष्ट झाला आहे. रावेर लोकसभा मतदारसंघातून शेख रहुब युसुफ, राहुल रॉय अशोक मूळे, नितीन प्रल्हाद कांडेलकर, शेख कुर्बान शेख करीम.नाजमीन शेख रमजान या ५ अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now