मुक्ताईनगर तालुका हादरला ! महिलेचा दगडाने ठेचून हत्या

एप्रिल 6, 2024 6:09 AM

जळगाव लाईव्ह न्यूज | 06 एप्रिल 2024 | मुक्ताईनगर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. महिलेचा दगडाने ठेचून निर्घृण खून करण्यात आल्याची घटना तालुक्यातील महालखेडा शिवारात उघडकीस आलीय. मालताबाई मनोज खाडे ( वय अंदाजे ३७ ) असं हत्या झालेल्या महिलेचं नाव असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

murder raver

याबाबत असे की, महालखेडा येथील रहिवासी मालताबाई मनोज खाडे या आपल्या शेतात काम करण्यासाठी सकाळी गेल्या होत्या. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास त्या शेतातील काम आटोपून घरी येत होत्या. दरम्यान, शिवारातच कुणी तरी अज्ञात व्यक्तीने दगडाने ठेचून त्यांचा खून करून पलायन केले. मालताबाई घरी न आल्यामुळे कुटुंबिय शेताकडे गेले असता सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरिक्षक नागेश मोहिते यांनी पथकाला रवाना केले. या पथकाने महिलेचे पार्थिव शवविच्छेदनासाठी पाठवत तपासाची चक्रे फिरवली आहेत. या संदर्भात रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. तर या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now