Jamner : व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर अत्याचार ; चौघांवर गुन्हा दाखल

एप्रिल 4, 2024 5:35 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ एप्रिल २०२४ । राज्यासह जळगाव जिल्ह्यात महिलांसह अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत असून अशातच जामनेर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. तरूणीचे अश्लिल छायाचित्र व व्हिडीओ काढून व्हायरल करण्याची धमकी देवून तिच्यावर वारंवार अत्यााचार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत चौघांवर पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime jpg webp

नेमका प्रकार काय?
जामनेर तालुक्यातील एका गावात २० वर्षीय तरूणी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. सध्या ती शिक्षण घेत आहे. दरम्यान, मंगलाकर उर्फ सुदाम संभाजी कोळी वय ३०, राहूल सुनिल चौधरी वय-२८, सतिष रघुनाथ नाईक उर्फ चव्हाण वय-२८ तिघे रा. शेंदुर्णी आणि गणेश संजय सोनवणे रा. मध्यप्रदेश या चौघांनी तरूणीला तिचे अश्लिल फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली.

यातील संशयित आरोपी सुदाम संभाजी कोळी याने पिडीत तरूणीवर मार्च २०२३ ते १८ ऑक्टोर २०२३ दरम्यान वेळोवेळी अत्याचार केला. तसेच राहूल चौधरी, सतिष नाईक, गणेश सोनवणे यांनी पिडीत तरूणीला अनवान्टेंड गोळ्या देवून सुदाम कोळी याला मदत करत होते. हा प्रकार सहन न झाल्याने अखेर पिडीत तरूणीने पहूर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी मंगलाकर उर्फ सुदाम संभाजी कोळी, राहूल सुनिल चौधरी, सतिष रघुनाथ नाईक उर्फ चव्हाण तिघे रा. शेंदुर्णी आणि गणेश संजय सोनवणे रा. मध्यप्रदेश यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिलीप पाटील हे करीत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now