‘ए खुदा तेरी भी क्या कमाल है…’ भाजपच्या बैठकीत डॉ. उल्हास पाटलांची शेरोशायरी

मार्च 20, 2024 5:23 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २० मार्च २०२४ । आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची जळगाव जिल्हा आढावा बैठक पार पडली. यावेळी उपस्थित डॉ. उल्हास पाटील यांच्या शेरोशायरीने ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन खुष झाले. दुसरीकडे त्यांनी एकनाथ खडसे यांच्यावर सडकून टीका केली आहे.

ulhas patil jpg webp

उल्हास पाटील यांनी फटकेबाजी करताना म्हटले की कॉंग्रेस असताना एवढ्या गर्दीची सवय नव्हती आणि शेर पेश केला. ‘ए खुदा तेरी भी क्या कमाल है…तेरा शोरूम इतना है…तो तेरा गोडाऊन कितना… असा शेर पाटील यांनी गर्दीला उद्देशून पेश केला. आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन खुश झाले आणि त्यांनी वन्समोअर म्हटले.

दरम्यान, जळगाव जिल्ह्यात भाजपला कुत्रही विचारत नव्हते, त्यावेळी मी पक्ष वाढवला असे विधान एकनाथ खडसे यांनी केले होते. या वक्तव्याचा मंत्री गिरीश महाजन यांनी जोरदार समाचार घेत एकनाथ खडसे यांच्यावर जोरदार टीका करीत त्याचं सगळं मागचं पुढचं काढलं आहे. पक्षात असताना आपण काय काय केले. कुणा, कुणा विरोधात षडयंत्र केले हे सांगण्याची गरज नाही. या सर्व गोष्टीचा आपण साक्षीदार असल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. तुम्ही कोणा कोणाला संपवलं, हे आम्हाला बोलायला लावू नका अशा शब्दात मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्या टीका केली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now