Yawal : अवैधरित्या लाकूड वाहतूक करणाऱ्यावर वनविभागाची कारवाई, एकावर गुन्हा दाखल

मार्च 18, 2024 4:23 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मार्च २०२४ । यावल तालुक्यातील मोहराळा ते कोरपावली रस्त्याने अवैध लाकूड वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर वनविभागाच्या पथकाने कारवाई करत वाहनचालक खलील रफिक तडवी रा. कोरपावली याच्याविरुद्ध वनअपराध अन्वये वनगुन्हा दाखल करण्यात आला आल्याची माहिती सहा. वनसंरक्षक (वनीकरण व वन्यजीव) प्रथमेश वि. हाडपे, चोपडा यावल वनविभाग, जळगांव यांनी दिली आहे.

avaidh lakud jpg webp

उपवनसंरक्षक, यावल वनविभाग जळगाव यांच्यकडून मिळालेल्या गुप्त बातमी वरून मोहरला ते कोरपावली रस्त्याने वनपथक दबा धरुन् बसले असताना एका ट्रॅक्टर मध्ये अंजन, निम इमारतीचे अवैधरित्या लाकूड वाहतूक करतअसल्याचे निदर्शनास आले. वाहनचालकाकडे लाकूड वाहतूक परवाना नसल्याने वनगुन्हा घडल्याचे निदर्शनास आल्याने मुद्देमालासह वाहन पुढील चौकशी साठी ताब्यात घेऊन शासकीय आगार यावल येथे जमा केले.

पुढील कार्यवाही जखीर एम शेख, उपवनसंरक्षक, यावल वनविभाग, प्रथमेश वि. हाडपे, सहाय्यक वनसंरक्षक (वनीकरण व वन्यजीव) चोपडा यांच्या मार्गदर्शनाखाली सुनिल भिलावे, वनक्षेत्रपाल यावल पुर्व स्वप्नील फटांगरे यांनी व त्यांचे अधिनस्थ स्टाफ हे करीत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now