कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकऱ्याची रेल्वेखाली उडी ; जळगाव तालुक्यातील घटना

मार्च 17, 2024 11:26 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । 17 मार्च 2024 । शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून एका तरुण शेतकऱ्याने रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीला आले आहे.ज्ञानेश्वर त्र्यंबक वाणी (वय ३५, रा. दापोरा ता. जळगाव) असे मयत तरुण शेतकऱ्यांचे नाव असून याबाबत तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

train crime jpg webp

जळगाव तालुक्यातील दापोरा येथे ज्ञानेश्वर वाणी हा आई-वडील, पत्नी, दोन मुले यांच्यासह राहत होता. त्याला तीन विवाहित बहिणी आहेत. शेतीकाम करून तो परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. दरम्यान शुक्रवारी १५ मार्च रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास दापोरा ते शिरसोली दरम्यान रेल्वे रुळावर पुलावर खंबा क्रमांक ४०७च्या १ ते ३ दरम्यान ज्ञानेश्वर वाणी यांनी रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, आजूबाजूच्या ग्रामस्थांना घटना समजली तेव्हा त्यांनी दापोरा गावचे पोलीस पाटील जितेश गवांदे यांना माहिती दिली. पोलीस पाटील गवांदे यांनी तालुका पोलीस स्टेशनला खबर देऊन सदर मृतदेह हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे दाखल केला. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मयत घोषित केले.

ज्ञानेश्वर वाणी यांना मयत घोषित करताच कुटुंबीय व नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता. तालुका पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now