रक्षा खडसेंना पुन्हा संधी ; रावेरमध्ये भाजपच्या शेकडो पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

मार्च 14, 2024 10:52 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मार्च २०२४ । भाजपने काल बुधवारी (१३ मार्च) सायंकाळी आगामी लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली असून यात रावेर लोकसभा मतदारसंघातून विद्यमान रक्षा खडसे यांनी पुन्हा संधी दिली. मात्र रक्षा खडसेंना उमेदवारी दिल्याने भाजपचे स्थानिक एकनिष्ठ कार्यकर्ते नाराज झाले असून शेकडो पदाधिकार्‍यांनी आपापल्या पदांचे राजीनामे दिली. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

raksha khadse bjp jpg webp

दरम्यान, मागील काही दिवसापासून रावेरमधून विद्यमान खासदार रक्षा खडसेंचं तिकीट कापून स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांचे चिरंजीव तथा विद्यमान जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. मात्र काल भाजपने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना तिसऱ्यांदा संधी दिली. रक्षा खडसे यांचं तिकीट जाहीर झाल्याने रावेर लोकसभेतील भाजप इच्छुक एक गट नाराज झाला.

तर दुसरीकडे यामुळे तिकिटाचे प्रबळ दावेदार असणार्‍या विद्यमान जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांच्या समर्थकांमध्ये संतापाची प्रचंड लाट उसळली आहे. यातूनच यावल-रावेरमधील शेकडो पदाधिकार्‍यांनी आपापल्या पदांचे राजीनामे हे त्यांच्याकडे सुपुर्द केले आहेत. कोणत्याही स्थितीत आपण रक्षा खडसे यांचा प्रचार करणार नसल्याची भूमिका या पदाधिकार्‍यांनी घेतली आहे.

यांनी दिले राजीनामे
दरम्यान, राजीनामा देणार्‍या पदाधिकार्‍यांमध्ये पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष हिराभाऊ चौधरी, तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, सहकार आघाडी जिल्हाध्यक्ष राकेश फेगडे, फैजपूरचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग सराफ, ओबीसी मोर्चा राज्य उपाध्यक्ष हर्षल पाटील, नारायणबापू चौधरी यांच्यासह शेकडो पदाधिकार्‍यांचा समावेश आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now