खुशखबर! जळगावहून ‘या’ तीन शहरांसाठी विमानसेवा सुरु होणार

मार्च 12, 2024 11:37 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगावकरांसाठी एक आनंदाची बातमी असून केंद्र शासनाच्या उडान योजनेअंतर्गत लवकरच जळगाव विमानतळावरून हैदराबाद, गोवा, पुण्यासाठी विमानसेवा सुरु होणार आहे. यासाठी ‘फ्लाय ९१’ या विमान कंपनीला भारत सरकारच्या नागरी विमान वाहतूक मंत्रालयाअंतर्गत डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन अर्थात डीजीसीएकडून गेल्या काही दिवसापूर्वी परवानगी मिळाली आहे. त्यामुळे आता लवकरच या विमानसेवेचे वेळापत्रक जाहीर केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे

jalgaon airport jpg webp

मागील गेल्या तीन वर्षांपासून जळगावची विमानसेवा बंद पडली आहे. विमानसेवा अचानक बंद झाल्यानंतर, जळगाव विमानतळावरून कुठल्याही विमान कंपनीतर्फे विमानसेवा सुरू करण्यात आलेली नव्हती. गेल्या वर्षी उडान योजनेच्या तिसऱ्या राउंडमध्ये नवीनच स्थापन झालेल्या ‘फ्लाय ९१’ या विमान कंपनीने जळगावहून एकाच वेळी पुणे, गोवा व हैदराबादसाठी विमानसेवा सुरू करण्याची तयारी दर्शवली.

अखेर सर्व परवानगीनंतर नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनने ६ मार्च २०२४ रोजी प्रमाणपत्र दिले. यामुळे आता लवकरच जळगाव विमानतळावरून पुणे, गोवा हैद्राबादसाठी विमानसेवा सुरु होणार आहे.

दरम्यान लवकरच उन्हाळी सुट्ट्या लागणार असून यादरम्यान अनेक जण गोवा फिरण्याचा प्लॅन करतात. जळगावहुन गोव्याला जाण्यासाठी एकच ट्रेन धावते. त्यातही कन्फॉर्म तिकीट मिळणे कठीण असते. लोक विविध पर्यायाने गोवा जातात. मात्र आता लवकरच गोव्यासाठीही जळगावहून थेट विमानसेवा सुरु होणार असल्याने जिल्ह्यातून गोवा जाणाऱ्या पर्यटकांच्या वेळेत बचत होईल.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now