शेताच्या बंधाऱ्यावरून बैलगाडी उलटली, 13 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू

मार्च 12, 2024 11:02 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मार्च २०२४ । जळगाव तालुक्यातील वाकडी येथील १३ वर्षीय मुलाचा शेताच्या बंधाऱ्यावरून अचानक बैलगाडी उलटल्याने कठड्याला लावलेला लोखंडी विळा डोक्यात घुसल्याने जागीच मृत्यू झाला. गौरव आनंदा पाटील असे मयत झालेल्या मुलाचे नाव असून याबात एमआयडीसी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

crime 2 jpg webp

गौरव हा आई-वडील, भाऊ आणि बहीण यांच्यासोबत जळगाव तालुक्यातील वाकडी येथे वास्तव्याला होता. तो म्हसावद गावातील थेपडे विद्यालयात सातवीच्या वर्गात शिकत होता. सोमवारी दुपारी चारा आणण्यासाठी शेतात बैलगाडीने गेला. शेतात चारा घेऊन येत असताना दुपारी अडीच वाजता बैलगाडीने शेताच्या बांधावरून येत असताना अचानक बैलगाडी उलटली.

यात बैलगाडीच्या कठड्याखाली गौरव दाबला गेला. त्यातच बैलांनी झटका दिल्याने लाकडी दुस्सर तुटली. यामुळे लोखंडी कठड्याला लावलेला लोखंडी विळा गौरवच्या कपाळात घुसला. घटनेत गौरव पाटील हा जागीच ठार झाला. शेताजवळ असलेल्या काही शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले. यावेळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाइकांनी एकच आक्रोश केला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now