पत्नी झोपेत असताना पतीने उचललं नको ते पाऊल.. शिरसोलीतील घटना

मार्च 10, 2024 11:40 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । 10 मार्च 2024 । कौटुंबिक विवंचनेतून ३२ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे आज दि. १० मार्च रोजी पहाटे उघडकीस आली आहे. रमेश उर्फ रवींद्र निंबा पाटील (वय ३२, रा शिरसोली) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ravi patil shirsoli jpg webp

याबाबत असे की, रवींद्र पाटील हा जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील अशोक नगर मध्ये पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई, मोठा भाऊ यांच्यासह वास्तव्याला होता. गावात फोटोग्राफीचा व्यवसाय करून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. दरम्यान, रविवारी मध्यरात्री घरातील स्वयंपाक घरात दरवाजा बंद करून झोक्याच्या दोरीला ओढणी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान पहाटे अडीच ते तीन वाजेच्या सुमारास त्यांची पत्नी शितल झोपेतून उठली तेव्हा पती दिसून आले नाही. त्यांनी शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा स्वयंपाक घराचा दरवाजा आतमधून बंद होता. त्यांनी शेजारच्या नागरिकांना बोलावून दरवाजा तोडला. तेव्हा तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.

गेल्या दोन दिवसांपासून तो काहीतरी कौटुंबिक विवंचनेत असल्याची माहिती नातेवाईकांकडून मिळाली.नातेवाईकांनी त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मयत घोषित केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास जितेंद्र राठोड हे करीत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now