कामावरून घरी परतताना घडलं भलतंच ; तरुणाने गमावला जीव..

फेब्रुवारी 26, 2024 1:19 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । 26 फेब्रुवारी 2024 | अपघाताची एक मोठी बातमी समोर आली आहे. कामावरून घरी परतत असताना समोरून येणाऱ्या भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्यामुळे ३४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना जळगाव ते कानळदा रस्त्यावरील वळणावर घडली. पंकज राजेंद्र मराठे (३४, रा. कानळदा, ता. जळगाव) असं मृत तरुणाचे नाव असून याबाबत तालुका पोलिस ठाण्यात कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

kanalda acc jpg webp

तालुक्यातील कानळदा येथील पंकज मराठे हा तरुण जळगावातील एका गादी कारखान्यात कामाला होता. शनिवारी रात्री तो व त्याचा मित्र गोपाल पाटील दुचाकीने जळगाव येथून कानळदा येथे घरी जात होते. आव्हाणे गावाच्या पुढे गेल्यानंतर एका वळणावर कानळदाकडून येणाऱ्या भरधाव कारने (क्र. एम.एच. १४, पी १५६०) जोरदार धडक दिली.

अपघातानंतर दुचाकीवरील दोघांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता पंकज मराठे याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. गंभीर जखमी गोपाल पाटील याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर रविवार, २५ फेब्रुवारी रोजी सकाळी मृताचे नातेवाईक व मित्र मंडळींची शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गर्दी झाली होती. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास धनराज पाटील करीत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now