⁠ 
शुक्रवार, ऑक्टोबर 18, 2024
Home | गुन्हे | ६५ वर्षीय वयोवृध्दाचा चिमुकलीवर लैंगिक अत्याचार ; रावेर तालुक्यातील संतापजनक प्रकार

६५ वर्षीय वयोवृध्दाचा चिमुकलीवर लैंगिक अत्याचार ; रावेर तालुक्यातील संतापजनक प्रकार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २० फेब्रुवारी २०२४ । जळगावमधील रावेर तालुक्यातून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. दारू पिऊन नशेत असलेल्या एका ६५ वर्षीय वयोवृध्दाने पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आलाय. याबाबत तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी संशयितास अटक केली आहे.

रावेर तालुक्यातील एका गावातील पीडित चिमुरडी हि तिच्या आजीच्या घरी मागील एक महिन्यापासून राहत होती. दरम्यान १८ फेब्रुवारीला दुपारी घरात कोणीही नसताना संशयित ६५ वर्षीय वयोवृध्दाने पाच वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केला. दरम्यान, संशयित हा गोलवाडे (ता. रावेर) येथील रहिवासी आहे. घडला प्रकार मुलीने घरात सांगितल्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसात धाव घेत तक्रार दिली.

या प्रकरणी निंभोरा पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी संशयितास अटक केली आहे. त्यास रावेर न्यायालयात हजर केले असता चार दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. निंभोरा पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक हरिदास बोचरे तपास करीत आहेत.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.