गावठी पिस्तूल घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

फेब्रुवारी 19, 2024 2:56 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । 18 फेब्रुवारी 2024 । बेकायदेशीररित्या गावठी पिस्तूल हातात घेऊन दहशत माजविणाऱ्या संशयित आरोपीला शनिपेठ पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ईश्वर रामा पारधी वय-२३ रा. धानोरा ता.जळगाव असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव असून त्याच्याविरुद्ध शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

kulbhushanpatil firing case arrest

याबाबत असे की, जळगाव शहरातील काशीबाई उखाजी कोल्हे शाळेच्या पाठीमागील भागात संशयित आरोपी ईश्वर पारधी हातात गावठी पिस्तूल घेऊन परिसरात दहशत माजवीत असल्याची गोपनीय माहिती शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना मिळाली. त्यानुसार पथक तयार करून कारवाई करण्यासाठी रवाना केले.

दरम्यान पथकाने कारवाई करत सायंकाळी ५ वाजता संशयित आरोपी ईश्वर पारधी याला अटक केली. त्याच्याकडून ५ हजार रुपये किमतीचा गावठी पिस्तूल हस्तगत केला आहे. या याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल राहुल पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी ईश्वर रामा पारधी यांच्या विरोधात रात्री १०.३० वाजता शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल परिस्थिती जाधव हे करीत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now