टास्क’च्या नावाने पावणे नऊ लाखांचा चुना लावणारा पोलिसांच्या जाळ्यात.. कोलकात्यातून ठोकल्या बेड्या

फेब्रुवारी 12, 2024 6:35 AM

जळगाव लाईव्ह न्यूज : 11 फेब्रुवारी 2024 : टास्क पूर्ण करून त्यामध्ये गुंतवणूक केल्यास अधिकचा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत ऑनलाइन फसवणूक करणाऱ्याला जळगाव सायबर पोलिस ठाण्याच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कोलकाता येथून अटक केली. गौरव गौतम बर्मन (२४, रा. राजरहाट, गोपालपपरा, कोलकाता) असे आरोपीचे नाव असून त्याला न्यायालयात हजर केले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.

crime 2 jpg webp

चेतन कन्हैया फिरके (३१, रा. जामनेर) यांची आठ लाख ७५ हजार १७५ रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली होती. याप्रकरणी अनोळखी व्यक्तीविरुद्ध सायबर पोलिस ठाण्यात ९ सप्टेंबर २०२३ रोजी गुन्हा दाखल झाला. गौरव गौतम बर्मन याने हा गुन्हा केल्याचे समोर आले होते.

त्यानुसार जळगाव सायबर पोलिसांनी गौरव याला कोलकाता येथून अटक करून जळगावात आणले. त्याला न्यायालयात हजर केले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. ही कारवाई सायबर पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार वसंत बेलदार, पोहेकॉ हेमंत महाडिक, पोहेकॉ मिलिंद जाधव यांनी केली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now