महागड्या सायकली लांबविणारा चोरटा पोलिसांच्या जाळ्यात, लाखोंचा मुद्देमाल हस्तगत

फेब्रुवारी 10, 2024 4:37 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १० फेब्रुवारी २०२४ । जळगाव शहरासह जिल्ह्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून वाहन चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. अशातच महागड्या सायकली चोरणारा सराईत रेकॉर्डवरील चोरट्याला पोलिसांनी अटक केलीय. त्याच्याकडून १ लाख ८५ हजार रुपयांच्या ७ सायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. जयेश अशोक राजपूत (वय १९, रा. मयुर कॉलनी) असं अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.

cycle chor jpg webp

याबाबत असे की, जळगाव शहरातील मायादेवी नगरात राहणारे योगेश बडगुजर यांची स्कॉट कंपनीची स्पीड स्टार सायकल त्यांच्या घराच्या कंपाऊंटमधून २४ जानेवारी रोजी चोरुन नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करीत असतांना ही सायकल पिंप्राळा परिसरातील मयूर कॉलनी येथील सराईत चोरटा जयेश राजपुत याच्याकडे असल्याची माहिती रामानंद नगर पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील यांना मिळाली.

त्यांनी लागलीच पथक तयार करुन संशयिताला ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या. चोरट्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याची चौकशी केली असता, त्याने सायकल चोरल्याची कबुली दिली. तसेच त्याने दीड लाखाच्या महागडी सायकलबरोबर इतर सात चोरलेल्या सायकली काढून दिल्या. पोलिसांनी त्याच्याकडून १ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now