पती कामावर, घरात एकटीच असलेल्या विवाहितेने उचललं धक्कादायक पाऊल

फेब्रुवारी 6, 2024 1:09 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । 6 फेब्रुवारी 2024 । पती कामावर गेलेला असताना घरात एकटीच असलेल्या मनीषा लहू मोरे (२५, रा. आव्हाणे, ता. जळगाव) विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घराचा दरवाजा उघडाच असल्याने शेजारच्या मंडळींना विवाहितेचा मृतदेह दिसला. त्यावेळी तिच्या पतीला माहिती देत मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आला. ही घटना सोमवार, ५ फेब्रुवारी दुपारी साडेबारा वाजता उघडकीस आली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

d1 1 jpg webp

तालुक्यातील आव्हाणे येथे मजुरी करणारे लहू मोरे हे पत्नी मनीषा व तीन वर्षीय मुलीसह राहतात. सोमवार, ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ते कामावर गेले होते. त्यावेळी घरात एकटीच असलेल्या मनीषा मोरे या विवाहितेने गळफास घेतला. घराचा दरवाजा उघडाच असल्याने दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास शेजारील मंडळींना विवाहिता गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली.

त्यांनी तिच्या पतीला घटनेची माहिती कळवली व मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आला. तेथे डॉक्टरांनी विवाहितेला मृत घोषित केले. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत विवाहितेच्या पश्चात पती, तीन वर्षांची मुलगी आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now