सोने दरात ४०० रुपयांची वाढ ; चांदीत घसरण.. तपासून घ्या आजचा भाव

फेब्रुवारी 5, 2024 10:44 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ फेब्रुवारी २०२४ । डिसेंबरमध्ये ग्राहकांना घाम फोडणाऱ्या सोन्यासह चांदीच्या किमतीत जानेवारीत दिलासा मिळाला. मात्र फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच सोन्याच्या किमतीत वाढ होताना दिसत आहे. आठवडाभरात सोने दरात प्रति तोळा ४०० रुपयांची वाढ झाली. तर दुसरीकडे चांदीचे दर आठवडाभर स्थिर होते. पण शेवटच्या दिवशी त्यात ५०० रुपयांची घसरण झाल्याने चांदी ७२,५०० रुपये किलो झाली.

gold silver jpg webp

जळगावच्या सुवर्णनगरीत गेल्या सोमवारी सोन्याचे प्रती तोळ्याचे दर ६३,००० रुपये होते. दुसऱ्या दिवशी ३००ने वाढ होऊन पुन्हा घसरण झाली, शुक्रवारी ते ६३,७०० रुपयांपर्यंत गेले. पण शनिवारी ४०० रुपये घसरण होऊन ते ६३,४०० रुपये झाले, चांदीचे दर सोमवार ते शुक्रवार ७३,००० हजार रुपये कायम होते; परंतु शनिवारी त्यात ५०० रुपयांची घसरण नोंदवली गेली. ही घसरण मागणीत जी घट झाली त्याचा परिणाम आहे.

MCX वर सोन्या-चांदीची किंमत किती आहे?
तर मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचा भाव 0.24 टक्क्यांनी म्हणजेच 147 रुपयांच्या घसरणीसह 62,415 रुपयांवर आहे. तर चांदीचा भाव 0.50 टक्क्यांनी म्हणजेच 343 रुपयांनी घसरून 70,855 रुपयांवर व्यवहार करत आहे. दुसरीकडे, यूएस कॉमेक्स या विदेशी बाजारात सोन्याच्या किमतीत 0.32 टक्क्यांनी घसरण झाली आहे, म्हणजेच $6.50 ते $2,04

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now