मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातून धावणाऱ्या या गाडीला मार्च अखेरपर्यंत मुदतवाढ

जानेवारी 30, 2024 11:17 AM

जळगाव लाईव्ह न्यूज | 30 जानेवारी 2024 | मध्य रेल्वेने अमरावती व पुणे दरम्यान धावणाऱ्या द्वि साप्ताहिक विशेष रेल्वेला मार्च महिन्याच्या शेवटपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.

train jpg webp

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभाग रेल्वे प्रबंधक कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, २८ जानेवारीपर्यंत अधिसुचीत असलेले गाडी क्र. ०१४३९ पुणे-अमरावती विशेष एक्स्प्रेस २ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२४ या कालावधीत दर शुक्रवारी व रविवारी पुणे स्थानकावरून रात्री २२:५० वाजता रवाना होऊन दुसऱ्या दिवशी १७:३० वाजता अमरावती स्थानकावर पोहोचणार आहे.

परतीच्या प्रवासात गाडी क्र. ०१४४० अमरावती-पुणे विशेष एक्स्प्रेस ३ फेब्रुवारी ते १ मार्च २०२४ या कालावधीत शनिवार व सोमवारी अमरावती स्थानकावरून १९:५० वाजता रवाना होऊन दुसऱ्या दिवशी १६:२० वाजता पुणे स्थानकावर पोहोचणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now