दशक्रियेला निघालेल्या व्यावसायिकाला विनाक्रमांकाच्या डंपरने चिरडले : जळगाव तालुक्यातील घटना

जानेवारी 29, 2024 9:40 AM

जळगाव लाईव्ह न्यूज : 29 जानेवारी 2024 : जळगाव जिल्ह्यात वाळू उपसा बंद असला तरी अनेक ठिकाणी वाळूची सर्रास वाहतूक सुरू असल्याचे अनेक घटनांवरून वारंवार समोर येत आहे. त्यातच नातेवाइकांकडे दशक्रिया विधीसाठी जात असलेल्या एका 64 वर्षीय प्रौढाला वाळू वाहतूक करणाऱ्या विनाक्रमांकाच्या डंपरने चिरडले.

IMG 20240129 092131 jpg webp

घटना रविवारी जळगाव तालुक्यातील पळासखेडा मिराचे गावाजवळ घडली. कमलाकर मोतीराम पाटील (६४, रा. जळके, ता. जळगाव) असं मृत व्यक्तीचे नाव असून अपघातानंतर डंपर चालक पसार झाला व काही वेळानंतर घटनास्थळावरून डंपर ही पळवून नेण्यात आले.

याबाबत असे की, जळगाव तालुक्यातील जळके येथील रहिवासी असलेले कमलाकर पाटील यांचे गावातच किराणा दुकान आहे. रविवारी त्यांच्या नातेवाइकांकडे दशक्रिया विधी असल्याने ते जामनेर तालुक्यातील नाचणखेडा येथे दुचाकीने (क्र. एमएच १९, डीएन ७९१४) जात होते. पळासखेडा मिराचे गावाच्या थोडे पुढे गेल्यानंतर शाळेजवळ समोरून येणाऱ्या विना क्रमांकाच्या भरधाव वाळूच्या डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात कमलाकर पाटील हे ठार झाले.

दरम्यान अपघातानंतर डंपरचा चालक घटनास्थळावरून पसार झाला. घटनास्थळी वाहतूकदारांनी येऊन वाळू वाळू उपसून डंपर घेऊन पसार झाले. वाळू वाहतूकदारांच्या या मुजोरीबद्दल नागरिकांनी मोठा संताप व्यक्त केला.
अपघातानंतर पाटील यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झालेला होता. घटनेची माहिती मिळाल्यानंतर ग्रामस्थ तसेच नातेवाइकांची रुग्णालयात गर्दी झाली होती. मयताच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, दोन मुली, जावई असा परिवार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now