मारुतीचे दर्शन घेऊन परतताना दुचाकीला भीषण अपघात ; जळगावचा युवक ठार, दोघे जखमी

जानेवारी 22, 2024 3:18 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । 22 जानेवारी 2024 । बोदवड तालुक्यातील शिरसाळा येथील मारुतीचे दर्शन घेऊन परतताना तरुणाच्या दुचाकीचा घसरून भीषण अपघात झाला. यात जळगावमधील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना मन्यारखेडा फाटाजवळ घडली. नेहाल राजेश माछरे (वय १८, रा. कंजरवाडा, जळगाव)असे मयत तरुणाचे नाव आहे. या दुर्घटनेप्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.

nehal macchare jpg webp

याबाबत असे की, जळगाव शहरातील कंजरवाडा परिसरात नेहाल माछरे हा आई, वडील, तीन भाऊ, एक बहिणीसह वास्तव्याला आहे. तो एका फोटो स्टुडिओत् तो कामाला होता. तसेच शिक्षणही करत होता. त्याचे वडील राजेश माछरे हे हातमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. दरम्यान त्याचा भाऊ अक्षय राजेश माछरे (वय २३) आणि त्याचे नंदुरबार येथून आलेली आतेबहीण उन्नती रविचंद्र रमाईचेकर (वय १२) हे दोघेजण सोमवारी २२ जानेवारी रोजी सुट्टी असल्यामुळे बोदवड तालुक्यातील शिरसाळा मारुती मंदिर येथे दर्शनासाठी गेले होते.

सकाळी दर्शन आटोपून परतत असताना १० वाजेच्या सुमारास मन्यारखेडा फाटाजवळ पुढील तरुणांच्या दुचाकीचा घसरून अपघात झाला. यावेळी स्थानिक नागरिकांनी व पोलिसांनी धाव घेत त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्या ठिकाणी नेहाल माछरे यास वैद्यकीय अधिकारी डॉ. आदित्य साळुंखे यांनी मयत घोषित केले.

तर जखमी अक्षय माछरे व उन्नती तमायचेकर यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान मयत नेहालच्या कुटुंबीयांना माहिती मिळताच त्यांनी शासकीय रुग्णालयात एकच गर्दी केली. त्यावेळेला त्यांनी मन हेलावणारा आक्रोश केला. यावेळी समाजबांधवांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. दरम्यान नशिराबाद् पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now