⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | नोकरी संधी | पोरांनो लागा तयारीला! भारतीय रेल्वेत 5696 जागांसाठी मेगाभरती

पोरांनो लागा तयारीला! भारतीय रेल्वेत 5696 जागांसाठी मेगाभरती

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । भारतीय रेल्वेमध्ये सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डने असिस्टंट लोको पायलट पदासांठी मेगाभरती जाहीर केली आहे. या भरती अधिसूचना जारी करणार आहे. Railway Recruitment 2024

रेल्वेच्या 21 झोनमध्ये ही भरती केली जाणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑनलाइन माध्यमातून फॉर्म भरू शकतील. या भरती अर्ज प्रक्रिया उद्या म्हणजेच २० जानेवारी २०२४ पासून सुरु होईल. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ फेब्रुवारी २०२४ पर्यंत असणार आहे. Railway Bharti 2024

वेतनमान : असिस्टंट लोको पायलटचा पगार 19900- 63200/- (स्तर-2) या वेतनश्रेणीनुसार असेल.
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळातून किंवा संस्थेतून 10वी उत्तीर्ण केलेली असावी. तसेच उमेदवारांना फिटर, इलेक्ट्रिशियन, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, मिलराइट/मेंटेनन्स मेकॅनिक, मेकॅनिक (रेडिओ/टीव्ही), इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, मेकॅनिक (मोटर व्हेईकल), वायरमन, ट्रॅक्टर मेकॅनिक, आर्मेचर आणि कॉइल वाइंडर, मेकॅनिकल (डिझेल), हीट टर्नर, मशिनिस्ट, रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग मेकॅनिकच्या ट्रेडमध्ये इंजिनचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. याशिवाय उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाईल इंजिनीअरिंगमध्ये तीन वर्षांचा डिप्लोमा केलेला असावा.
वयाची अट : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय किमान १८ वर्ष तर कमाल ३० वर्ष असायला हवे. राखीव प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या उमेदवाराला सवलत देण्यात येईल.

परीक्षा फी : सामान्य आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 500 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. SC, ST, माजी सैनिक, PWBD, महिला आणि तृतीय श्रेणीतील उमेदवारांना फक्त 250 रुपये शुल्क भरावे लागेल.
निवड कशी होईल?
असिस्टंट लोको पायलटच्या भरतीसाठी संगणक आधारित चाचणी घेतली जाईल.
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.