विटाने भरलेला आयशर कलंडल्याने तरुण ठार

जानेवारी 19, 2024 3:24 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जानेवारी २०२४ । विटाने भरलेला आयशर कलंडल्याने त्याखाली दबून एका मजुराचा मृत्यू झाल्याची घटना जळगाव तालुक्यातील नेरी गावाजवळ घडली. तर तीन जण जखमी झाले. श्याम कुमार तुलसीराम पाठे (वय-३४, रा. अजिंठा ता. जिल्हा छत्रपती संभाजीनगर) असे मृत मजुराचे नाव असून यातील जखमींना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

shyam pathe jpg webp

याबाबत असे की, जळगाव तालुक्यातील म्हसावद येथून आयशर क्रमांक (एमएच ०४ डीडी ७७०९) हा गुरुवार १८ जानेवारी रोजी विटा भरून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अजिंठा येथे जात होता. दरम्यान सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास नेरी गावाजवळून जात असताना रस्त्यावरील फुलाचा धापा तुटल्याने अचानक आयशर ट्रकचे चाक फसले. त्यातच ट्रक हा कलंडला गेला.

यामध्ये श्यामकुमार तुलसीराम पाठे हा तरुण दबला गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, तर सोबत असलेले सुनील भड्या कोठोडे वय-३३, शेख शकील शेख सलीम (वय-३२), आणि सलमान खान युसुफ खान सर्व रा. अजिंठा जि. छत्रपती संभाजीनगर असे तीन जण जखमी झाले आहे. दरम्यान ही घटना घडल्यानंतर स्थानिक नागरिकांनी धाव घेऊन जखमी झालेल्या तिघांना तातडीने खाजगी वाहनाने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now