यावल तालुका खुनाच्या घटनेनं पुन्हा हादरला ; डोक्यात कुर्‍हाड घालून प्रौढाची हत्या

जानेवारी 16, 2024 11:25 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । 16 जानेवारी 2024 । यावल तालुक्यातील पिळोदा येथे पोटच्या मुलाने जन्मदात्या पित्याची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच तालुक्यात दुसरी घटना घडली. रिधुरी येथे रस्त्याच्या वादातून एकाची हत्या झाल्याने यावल तालुका हादरला आहे. धनराज वासुदेव सोनवणे (वय ५०) असं मयताचे नाव असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

murder raver

नेमकी घटना काय?
रिधुरी गावात सोमवारी रात्री ८.३० वाजता घराच्या वापराच्या रस्त्यावरून दोन कुटुंबांमध्ये वाद झाला. त्याचे रुपांतर हाणामारीत होऊन धनराज वासुदेव सोनवणे (वय ५०) यांच्या डोक्यात कुर्‍हाडीने वार करण्यात आले. यात धनराज सोनवणे जागीच ठार झाले. तर याच हाणामारीत सतीश सुखदेव सोनवणे (वय ३०), आरती सतीश सोनवणे (वय २८) हे जखमी झाले असून त्यांच्यावर जळगाव येथे उपचार सुरू आहेत.

दरम्यान, या संदर्भात सोनी धनराज सोनवणे (वय ३५ रा. रिधुरी ) यांनी फैजपूर पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी सतीश सुकदेव सोनवणे, युवराज सुकदेव सोनवणे व दीपक युवराज सोनवणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना गजाआड करण्यात आले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरिक्षक निलेश वाघ हे करत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now