ट्रक आणि दुचाकीच्या भीषण अपघातात एक ठार ; एरंडोल नजीक घटना

जानेवारी 11, 2024 7:33 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जानेवारी २०२४ । एरंडोल शहरातील कासोदा फाट्याजवळ ट्रक आणि दुचाकीच्या भीषण अपघात झाल्याची घटना रात्री घडली . या दुर्घटनेत एक जण जागीच ठार तर इतर तीन जण गंभीररित्या जखमी झाले. दरम्यान, संतप्त नागरिकांनी रास्ता रोको करत चक्क जेसीबीच्या माध्यमातून राष्ट्रीय महामार्ग रस्ता खोदून काढला आहे. यामुळे दोन्ही बाजूच्या वाहतूक तब्बल ५ किलोमीटर पर्यंत वाहतूक खोळंबली आहे.

jalgaon mahanagar palika 10 jpg webp

एरंडोल शहरातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६वर बुधवार १० जानेवारी रोजी रात्री ९ वाजता चार चाकी ट्रक क्रमांक (एमएच ४८ एटी ७६८२) वरील चालकाने भरधाव वेगाने ट्रक चालवून थेट दुचाकी क्रमांक (एमएच १९ बीके ४४२) ला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील तरुण हा जागीच ठार झाला आहे. पुढे जात असलेल्या अजून एक दुचाकीला धडक दिली. त्यामुळे दोन्ही दुचाकी ट्रकखाली अडकले आहेत.

दरम्यान या अपघातामुळे एरंडोलकरांनी रास्ता रोको करण्यात आला. या ठिकाणी संतप्त नागरिकांनी चक्क जेसीबीच्या माध्यमातून राष्ट्रीय महामार्गावरील डांबरीकरण केलेला रस्ता खोदून काढला आहे. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला सुमारे ५ किलोमीटर पर्यंत वाहतूक खोळंबली आहे. दरम्यान बस ह्या एरंडोल शहरातून मार्गस्थ करत इतर रस्त्यातून काढत जळगाव मार्गे रवाना काढण्यासाठी पोलिसांची मदत घेतली जात आहे.

धरणगाव चौफुली येथे गेल्या अनेक वर्षांपासून उड्डाणपूल व्हावा, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि वाहनधारकांची होती. मात्र याकडे प्रशासनाने जाणून बुजून दुर्लक्ष केल्याचा आरोप येथील संतप्त नागरिकांनी केले आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा एरंडोल पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या घटनेबाबत अद्याप पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now