लाच भोवली : पोलीस हवालदारसह पंटर एसीबीच्या जाळ्यात

जानेवारी 10, 2024 2:54 PM

जळगाव लाईव्ह न्यूज | १० जानेवारी २०२४ | अमळनेर शहरात बांधकाम मटेरीयलची वाहतूक करणार्‍या व्यावसायिकाचा डंपर अडवून साहेबांच्या नावे हफ्ता म्हणून ३० हजारांची लाच मागून ती खाजगी पंटराच्या माध्यमातनू स्वीकारताना हवालदारासह खाजगी पंटराला धुळे एसीबीने रंगेहाथ अटक केली आहे. हवालदार घनश्याम अशोक पवार व खाजगी पंटर इम्रानखान शब्बीरखान पठाण असे अटकेतील संशयितांची नावे आहेत.

lach jpg webp

अमळनेर शहरातील रहिवासी असलेले तक्रारदार यांचा बांधकाम मटेरीयलचा व्यवसाय आहे. अमळनेरचे हवालदार घनश्याम पवार यांनी दि.७ जानेवारी रोजी तक्रारदार यांचा डंपर अडवत त्यांच्याकडे पोलीस निरीक्षक विजय शिंदे व स्वतःसाठी दरमहा हप्ता म्हणून ३० हजारांची लाच मागितली. तक्रारदाराने याबाबत धुळे एसीबीकडे दूरध्वनीवरून केल्यानंतर धुळे एसीबीने दि.९ रोजी लाचेबाबत पडताळणी केल्यानंतर हवालदार पवार यांनी ३० हजारांची लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाले. पथकाने लागलीच याबाबत सापळा लावला असता खाजगी पंटर इम्रान खान याच्याकडे लाचेची रक्कम देण्याचे घनश्याम पवार सांगितल्यानंतर सुरूवातीला खाजगी पंटर व नंतर घनश्याम पवार यांना एसीबीने अटक केली.

यांनी केली कारवाई
हा सापळा धुळे एसीबीचे पोलिस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक हेमंत बेंडाळे, पोलिस निरीक्षक रुपाली खांडवी, राजन कदम, मुकेश अहिरे, प्रशांत बागुल, मकरंद पाटील, रामदास बारेला, संतोष पावरा, प्रवीण मोरे, प्रवीण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांच्या पथकाने यशस्वी केला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now