जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मे २०२१ । यावल शहरातील धोबीवाडा परिसरातील राहणारी १२ वर्षीय अल्पवयीन मुलगी दीड वर्षांपूर्वी बेपत्ता झाले होते. मात्र अचानक पणे अल्पवयीन मुलीने आजोबांना संपर्क साधला त्यावरून आजोबांनी पोलिसांकडे हरवल्याची तक्रार दाखल केली. तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी मुलीचा शोध घेवून आजोबांना स्वाधीन केले आहे.
पोलिसांनी केलेल्या कामगिरीवर परिसरात कौतुक होत आहे. या संदर्भात यावल पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती अशी की ट्रिकल किरण कोळी ही यावल येथे आपल्या आईचे वडील आजोबा भिमसिंग गंगाराम कोळी रा. धोबीवाडा यावल यांच्याकडे राहून शिक्षण घेत असताना दि १९ नोव्हेंबर २०१९ रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास तिला शाळेच्या आवारातुन कुणीतरी विन वोळखी व्यक्ती रिक्षात बसवून घेवून गेल्यावून शाळेच्या सूत्रांकडून प्राप्त झाली होती.
दरम्यान याबाबत ट्रिकल केळीचे आजोबा भिमसिंग कोळी यांनी आपली नात व तिची आई मनिषा ही सुप्रीम काँलनीमध्ये जळगाव येथे राहत असल्याने सर्वप्रथम त्यांनी आपल्या मुलीकडे जाऊन नातूचा शोध घेतला असून मात्र त्याठिकाणी त्याच्या नात व मुलगी या दोघ ही मिळून आपल्या नातेवाईकांनकडे देखील ट्रिकल आणि तीची आई मनिषा त्या दोघांचा शोध घेतला. मात्र तरी ते मिळेल नाही. अखेर भिमसिंग कोळी यांनी आपली नात ही बेपत्ता असल्याचे तक्रार पोलिसात दाखल केली होती.
अखेर दीड वर्षा नंतर दि. २४ एप्रिल रोजी सकाळी ४ वाजता सुमारास अचानक ट्रिकलचा फोन आला आणि आपण देरवा चौक बडहलगंज गोरखपूर जिल्हा उत्तरप्रदेश सरकारी दवाखान्या मागे राहत असल्याने सविस्तर माहिती ट्रिकल केळी हिने आपल्या आजोबांना दिली की आपण येथे आपले प्राण आई सोबत मानसिंग उर्फ़ गुड्डन रामा शंकरसिंग सोबत राहत आहे सागितले. ह्याच व्यक्तिने यावलहून बदलून आपणास रिक्षा मध्ये बसवून उत्तरप्रदेश मध्ये आनले होते तेव्हापासून आपन आपल्या आई बरोबर कानपूर येथे राहत होते तेव्हापासून आपण आपल्या आई बरोबर कानपूर येथे राहत होते. परंतु साधारण एक महिन्यापूर्वी ट्रिकल केळी हिची आई मनिषा कोळी या महिलेचे कोरोनामुळे निधन झाले व त्यानंतर लागलीच सकाळी ४ वाजता ट्रिकल केळी हिने यावल येथे आपल्या आजोबांना संपर्क साधून सविस्तर माहिती कळविली.
या ट्रिकल हिने दिलेल्या माहितीनुसार तात्काळ पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांनी या विषयावर गांभिर्याने दखल घेऊन तात्काळ पोलिस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले आणि सहायक फौजदार विजय पाचपोळे या दोन अधिक-याचे पथक स्थापन करून अल्पवयीन मुलीचे आजोबा भिमसिंग कोळी यांना सोबत घेऊन पथक रवाना झाले व त्यांनी बडहलगंज पोलिसांच्या सहकार्याने देरवा चौक या गावात जाऊन अखेर त्या मुलीची ओळख तिच्या आजोबांनी केल्याने आजोबांचा आवाज ऐकून ट्रिकल ही आजोबांकडे धावत आली पोलिसांनी तिला ताब्यात घेतले व बडहलगंज पोलिस चौकीत आनले व उत्तरप्रदेश पोलिसांनी कायद्याची पूर्तता करून अखेर हे पथक त्या अल्पवयीन मुलाला घेऊन काल रात्री १२ वाजेच्या सुमारास यावल येथे दाखल झाले. यावल पोलिसांनी ट्रिकल केळी यांच्या कुटुंबीयांतील इतर मंडळीसी संपर्क साधून तिच्या आजेबांनसह कुटुंबांनच्या स्वाधीन केले यावेळी ट्रिकल चे आजोबा यांनी यावल पोलिसांचे विशेष आभार मानले आपले नातू आपल्या ताब्यात मिळाली या आनंदाने त्यांचे डोळे आनंदाने पानवले या सर्व तपासकार्यात यावल येथील भारतीय जनता पक्षाचे डॉ निलेश गडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली तसेच या शोधकार्यासाठी गेलेले पोलिस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले व सहायक फौजदार विजय पाचपोळे यांच्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल आभार मानून विशेष कौतुक करण्यात आले आहे.