चोरट्यांचा धुमाकूळ ! रावेरमध्ये एकाच रात्री तीन ठिकाणी घरफोड्या, लाखोंचा ऐवज लंपास

डिसेंबर 26, 2023 1:36 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ डिसेंबर २०२३ । जळगाव जिल्ह्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, बंद घर व रात्री गेलेल्या विजेची संधी साधून चोरटयांनी रावेर शहरात एकाच रात्री तीन ठिकाणी केलेल्या घरफोडीमध्ये २१ ग्रॅम सोने,चाळीस भार चांदी तर ७२ हजार असा ऐवज लंपास केला. यामुळे घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

raver chori jpg webp

रावेर शहरातील वेगवेगळ्या भागात चार ठिकाणी घरफोड्या झाल्या तर तीन ठिकाणी घरफोडी करण्याचा प्रयत्न झाला. ही सर्व घटना रावेर शहरात रात्री लाईट नसतांना झाल्या आहे. सौभाग्य नगर येथील रहीवासी असलेले प्रशांत पाटील कामा निमित्त नाशिक गेले असता.अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचा कडीकोंडा तोडून घरात प्रवेश केला व घरात असलेल्या कपाटा मधुन २१ ग्रॅम सोन्याचे दागीने तर १७ भार चांदी तर २७ हजार रोख चोरीला गेले.

दरम्यान, दुसरी घटना देखील सौभाग्य नगर मध्येच झाली आहे.येथील अशोक प्रेमसिंग पाटील हे त्यांच्या मूळ गावी पाचोरा येथे गेले असतांना त्यांच्या घराचा देखिल कडीकोंडा तोडून अज्ञात चोरट्यानी ४५ हजार रोख चोरुन नेले आहे.घरमालक प्रशांत पाटील यांच्या फिर्यादी वरुन रावेर पोलिस स्टेशन मध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तसेच तिसरी घटना जिआय कॉलनी येथे घडली असून श्रीमती अटकाळे यांचे देखील बंद घर फोडण्यात आले आहे. त्या बाहेरगावी असल्याने त्यांच्या कडे किती रुपयांचा ऐवज गेला अद्याप कळलेला नाही.

या घडलेल्या घटनांमुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण आहे. घडलेल्या घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी अन्नपूर्णा सिंग, प्रभारी अधिकारी सतीष अडसुर यांनी घरफोडी केलेल्या ठिकाणची पाहणी केली. पोलिसांनी गस्त वाढविण्याची मागणी आता करण्यात येत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now