धक्कादायक! व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

डिसेंबर 17, 2023 3:15 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ डिसेंबर २०२३ । मुलींना प्रेम जाळ्यात ओढून त्यांच्यात होणाऱ्या अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत आहे. अशीच एक घटना भुसावळ शहरातून समोर आली आहे. अल्पवयीन तरुणीवर अत्याचार करण्यात आला तसेच पुन्हा संबंध ठेवू देण्यास नकार देण्यात आल्याने फोटो, व्हिडिओ व्हायरलची धमकी देण्यात आली. याप्रकरणी 17 वर्षीय पीडीतेने शहर भुसावळ पोलिसात तक्रार दिल्यावरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

crime 3 1 jpg webp

शहरातील एका भागातील अल्पवयीन तरुणीचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध जुळल्यानंतर सन 2017 ते नोव्हेंबर 2023 दरम्यान (फेबु्रवारी 2019, जून 2019, ऑगस्ट 2019, तारीख नक्की नाही) शहरातील एका भागात निर्जनस्थळी अत्याचार करण्यात आला व पुन्हा शरीरसंबंध ठेवण्याची मागणी केल्यानंतर फिर्यादीने नकार दिल्यानंतर आरोपीने फोटो व व्हिडिओ व्हायरलची धमकी दिली.

त्रास असह्य झाल्याने पीडीतेने शहर पोलिसात तक्रार दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक निरीक्षक निलेश गायकवाड करीत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now