धरणगावात राष्ट्रीय एकात्मतेला बाधक कृत्य केल्याप्रकरणी 11 जणांविरुद्ध गुन्हा

डिसेंबर 17, 2023 12:44 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ डिसेंबर २०२३ । धरणगावात काढण्यात आलेल्या जुलुस ए गौसीया मिरवणुकीत राष्ट्रीय एकात्मतेला बाधक कृत्य केल्याप्रकरणी ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात अमोल सखाराम महाजन यांनी फिर्याद दिली आहे

crime 2 jpg webp

नेमकं काय म्हटलं आहे फिर्यादीत
फिर्यादीत अमोल महाजन यांनी म्हटलं आहे की, ८ नोव्हेंबर रोजी हाजी रफिक कुरेशी फाउंडेशन धरणगाव या मुस्लीम संघटनेतर्फे जुलुस ए गौसीया या मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी त्यांनी पोलीस प्रशासनाची परवानगी घेतली होती. याबाबत मला माहीत असून, त्या दिवशी मीसुध्दा धरणगाव शहरात जैन गल्लीत हजर होतो. सदरची मिरवणुक हि दुपारी ३ वाजेच्या सुमारास काढण्यात आली होती. सदर मिरवणुकीत अडीच ते तीन हजर लोक सहभागी झाले होते. ती मिरवणूक जैन गल्ली व बाजारपेठ धरणगाव या ठिकाणी असतांना, सदर जुलुस मिरवणुकीतील काही जणांनी हमास या दहशतवादी संघटनेच्या समर्थनार्थ तसेच इतरही वादग्रस्त घोषणा दिल्यात. तसेच हमास या दहशतवादी संघटनेचे झेंडे फडकविले.

यावेळी स्व:ता तेथे हजर असल्याने माझ्या मोबाईलमध्ये घोषणांची ऑडीओ, व्हीडीओ शुटींग केली असल्याचे अमोल महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. जुलुसमधील काही इसमांच्या हातात स्टीलचे रॉड होते. तसेच त्यांच्या हातात पॅलेस्टीन व हमास तसेच इतर झेंडे होते. संबंधितांनी भारताच्या एकतेला व अखंडतेला बाधा निर्माण होईल व दोन धर्मामध्ये तेढ निर्माण होईल, या उद्देशाने दहशत माजविण्याचा प्रयत्न केला असल्याचेही महाजन यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

यांच्यावर गुन्हा दाखल
या प्रकरणी भादवि कलम १५३A(१)(b) १८८ प्रमाणे १) शेख रफिक शेख मुसाकरेशी २) इरफान शेख अरमान ३) मोहंमद इस्राइल युसुफ ४) नगर मोमीन ५) नदीमोदीन एजाजोद्दीन काझी ६) कालु उस्ताद ७) मोहंमद सलीम मोहंमद इसाक मोमीन ८) इब्राहीम जनाब उर्फ इत्तुजनाव ९) अमजदखान गुलाब खान बेलदार १०) मो. अयास मो, सिद्दीकी ११) जुनेद खान पुर्ण नाव माहीत नाही (सर्व रा.धरणगाव) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तापस पीएसआय संतोष पवार हे करीत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now