Breaking : 14 हजाराची लाच घेताना पाटबंधारे विभागातील लिपीक जाळ्यात

डिसेंबर 15, 2023 12:31 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ डिसेंबर २०२३ । राज्यासह जळगाव जिल्ह्यात लाचखोरीच्या घटना सातत्याने समोर येत असून अशातच आणखी एक सरकारी बाबू जाळ्यात अडकला आहे. पाटबंधारे विभागातील एका लिपीकला १४ हजार रुपयाची लाच घेताना धुळे लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. तुषार अशोक पाटील असे लाचखोराचे नाव असून याबाबत पुढील कारवाई सुरु आहे.

lach chalisagaon jpg webp

तालुक्यातील शेतकऱ्यांना मन्याड धरणातून शासनाकडून मोफत गाळ देण्यात येते. परंतु पाटबंधारे विभागाकडून प्रति ट्रॅक्टर १२०० रूपये प्रमाणे ११ जणांकडून १४ हजार ४०० रुपये मागणी होत असल्याची गुप्त माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मिळाली. त्यावर सदर पथकाने आज सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास सापळा रचून पाटबंधारे विभागातील लिपिक तुषार अशोक पाटील याला ताब्यात घेतले असून पुढील कार्यवाही सुरू आहे.

दरम्यान सदर कार्यवाही एसीबीच्या (धुळे) पथकाने केली असून या कारवाईमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now