पाचव्या मजल्यावरून पडल्याने तरुण मजूर ठार, जळगावमधील घटना

नोव्हेंबर 27, 2023 3:18 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ नोव्हेंबर २०२३ । इमारती बांधकामाच्या ठिकाणी पाचव्या मजल्यावरून पडल्याने परप्रांतीय २६ वर्षीय मजूराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना जळगाव शहरातील नायरा पेट्रोल पंप परिसरात घडली. सुदाम दिलीप शर्मा (वय-२६) रा. दिनाजपुर पश्चिम बंगाल ह.मु. शिवकॉलनी, जळगाव असे मयत तरुणाचे नाव आहे.

crime bulding jpg webp

सुदाम दिलीप शर्मा हा कामाच्या निमित्ताने जळगाव शहरातील शिवकॉलनी परिसरात वास्तव्याला होता. रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुदाम पेट्रोल पंप परिसरात इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी काम करत होता. नेहमीप्रमाणे रविवारी २६ नोव्हेबर रोजी सायंकाळच्या सुमारास बांधकामाच्या ठिकाणी काम करत असतांना त्याचा तोल जावून पाचव्या मजल्यावरून पडला.

त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या सोबत असलेल्या सहकाऱ्यांना त्याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याप्रकरणी रामानंद नगर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now