जळगावकरांनो अभिनंदन ! नियमांचे पालन केल्याने कोरोना आकडेवारीत घट
जळगाव लाईव्ह न्यूज । २३ मे २०२१ । जळगावकर सरकारी नियमांचे काटेकोर पालन करत असल्याने जिल्ह्यातील कोरोना करोनाबाधितांची संख्या वेगाने कमी होत आहे. आज रविवारी जिल्ह्यात ३६२ नवे बाधित रुग्ण आढळून आले आहे. तर आज तब्बल ८५७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. गेल्या तीन चार दिवसांत दुपटीने रुग्ण संख्या कमी होऊ लागली आहे. शिवाय, मृतांचा आकडा देखील खाली असला तरी दिवसभरात ९ जणांचा मृत्यू झाला.
जळगाव जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या १ लाख ३८ हजार ३१३ वर गेली आहे. त्यापैकी १ लाख २८ हजार ०२४ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तर सद्यस्थितीला ७ हजार ८०२ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. अर्थात बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने ॲक्टिव रूग्णांची संख्या देखील आणखी कमी होईल. तर गेल्या २४ तासात ९ जणांचा मृत्यू झाला असून एकूण मृताचा आकडा २४८७ वर गेला आहे.
जळगाव शहराला दिलासा :
दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सुरुवातीपासून हॉटस्पॉट ठरलेल्या जळगाव शहरात कोरोना नियंत्रणात आला आहे. गेल्या दोन तिन महिन्यात रुग्णांची आकडेवारी २५० ते ३०० च्या घरात येत होती. परंतू आता पन्नासच्या घरात ही आकडेवारी आली आहे. आज शहरात ३३ नवे रुग्ण आढळून आले आहे तर ६५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. शहरात सध्या ५९४ रुग्णांवर उपचार सुरु आहे
आजची आकडेवारी
जळगाव शहर-३३, जळगाव ग्रामीण-२८, भुसावळ-४२, अमळनेर-३२, चोपडा-३१, पाचोरा-२, भडगाव-२, धरणगाव-१४, यावल-२५, एरंडोल-२, जामनेर-२७, रावेर-८, पारोळा-७, चाळीसगाव-६९, मुक्ताईनगर-१९, बोदवड-१७ आणि इतर जिल्ह्यात ४