दुःखद : जिल्ह्यात अजून एका तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

जळगाव लाईव्ह न्युज । २८ मे २०२२ ।| जिल्ह्यात अजून एका तरुण शेतकऱ्याची आत्महत्या केल्याची घटना समोर येत आहे. रावेर तालुक्यातील भामलवाडी येथील ४० वर्षीय शेतक-याने आत्महत्या ऐकली आहे. यावेळी त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

या बाबत अधिक माहिती वृत्त असे की, भामलवाडी ता. रावेर येथील शेतकरी विजय पाटील (वय ४०) यांनी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या तरुण शेतकऱ्याने कोणीही घरात नसतांना गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मयत विजय पाटील यांना दोन मुले, पत्नी,आई असे त्याचे कुटुंब आहे. त्याच्या या आत्महत्येमुळे गावात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.

निंभोरा पोलिसात अकास्मत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे . या बाबदचा पुढील तपास हे.कॉ. ज्ञानेश्वर चौधरी करीत आहे. कर्जबाजारीला कंटाळुन आत्महत्या केली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.