⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

पाचोरा येथे विविध खात्यातील अधिकारी, कर्मचारी व कामगारांचा मेळावा संपन्न

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मार्च २०२२ । NAC चे जेष्ठ नेते अनिल तात्या पवार यांचे अध्यक्षतेखाली पाचोरा येथे विविध खात्यातील अधिकारी, कर्मचारी व कामगार यांच्या मेळावा संपन्न झाला. या सभेला 150ते 200 पेंशन धारक होते.

हा मेळावा विठ्ठल मंदिर पाचोरा येथे घेण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष देविसिंग जाधव, जिल्हा अध्यक्ष अरविंद भारंबे, जिल्हा सचिव रमेश नेमाडे हे होते. इंजि.नंदलाल बोदडे यांची EPS 95 राष्ट्रीय संघर्ष समिती पाचोरा तालुका अध्यक्ष पदी तर झोपे जिल्हा बँक यांची तालुका सचिवपदी निवड करण्यात आली. उर्वरीत कार्यकारीणी लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. या मेळाव्या प्रसंगी सर्व मान्यवरांची समयोचित भाषणे झाली. तसेच विविध मागण्यांचे निवेदन प्रांताधिकारी पाचोरा यांना देण्यात आले.

निर्धार

ईपीएस ९५ पेन्शन धारक सेवानिवृत्त कामगार, कर्मचारी, अधिकारी, अभियंता यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर सेवानिवृत्त कर्मचारी यांना मिळणारे निवृत्ती वेतन’च्या तुलनेत तथा योग्य व महागाई भत्ता निगडित रक्कम मिळवून लाभ मिळावे. तसेच इतर लाभ मिळावे यासाठी भविष्यात राष्ट्रीय समितीचे निर्देश नुसार येणाऱ्या सूचना नुसार विविध प्रकारच्या सभा, आंदोलनं या मध्ये सक्रिय सहभागी होऊन मागण्या पदरात पडे पर्यंत संघर्ष तीव्र ठेऊ असा निर्धार करण्यात आला.