भुसावळ विभागातील प्रवाशांसाठी गुडन्यूज! ‘नाताळ’निमित्त पुणे-अजनी साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस धावणार

नोव्हेंबर 21, 2023 11:59 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ नोव्हेंबर २०२३ । मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. मध्य रेल्वेने आगामी नाताळ सणानिमित्त पुणे व अजनी दरम्यान साप्ताहिक विशेष सुपरफास्ट एक्स्प्रेस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. अप व डाऊन मार्गावर प्रत्येक दोन अशा एकूण चार फेऱ्या होणार आहे. दरम्यान, या गाडीला भुसावळमार्गे धावणार असल्याने जिल्ह्यातील प्रवाशांची सोय होणार आहे.

train 1

प्राप्त माहितीनुसार, ०१४६५ पुणे-अजनी साप्ताहिक सुपरफास्ट एक्स्प्रेस २६ डिसेंबर २०२३ आणि २ जानेवारी २०२४ रोजी पुणे स्थानकावरून १५:१५ वाजता रवाना होऊन दुसऱ्या दिवशी ०४:५० वाजता अजनी येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात ०१४६६ अजनी-पुणे साप्ताहिक सुपरफास्ट एक्स्प्रेस २७ डिसेंबर २०२३ आणि ३ जानेवारी २०२४ रोजी अजनी स्थानकावरून १९:५० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ११:३५ वाजता पुण्याला पोहोचेल.

या स्थानकांवर थांबेल
या गाड्यांना दौंड कॉर्डमार्ग, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, नांदुरा, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा या स्थानकांवर थांबा असणार आहे. एलएचबी कोचसह धावणऱ्या या एक्स्प्रेसला २० डबे असून, तीन एसी-२ टियर, १५ एसी ३-टियर आणि २ जनरेटर व्हॅन अशी संरचणा आहे. या एक्सप्रेससाठी विशेष शुल्कावरील बुकिंग २१ नोव्हेंबर रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर उघडेल.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now