दुचाकीवरील तिघांना भरधाव कारने उडविले ; शिरसोली नजीक घटना

नोव्हेंबर 18, 2023 12:02 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ नोव्हेंबर २०२३ । जळगावहुन शिरसोली येथे घरी जात असलेल्या दुचाकीवरील तिघांना एका भरधाव कारने उडविले. ही घटना शिरसोली रस्त्यावरील जैन व्हॅलीजवळ रात्री घडली असून या अपघातात तिघे जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून घटनेची माहिती घेत आहेत.

shirsoli accident jpg webp

याबाबत असे की, शिरसोली येथील रोहित ताडे, किशोर काटोले व पीयूष ताडे (सर्व रा. शिरसोली प्र.बो.) हे दुचाकी (एमएच १९ सीएस ९१३७) ने जळगाव वरून शिरसोली येत असताना त्यांच्या दुचाकीला भरधाव कारने (एम एच सियू ८०९३) मागून जबर धडक दिली.

या अपघातात तिघे जखमी झाले आहेत. नागरिकांनी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले. अपघातामध्ये रोहित ताडे व किशोर काटोले या दोन्ही तरुणांची प्रकृती गंभीर असून त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. तर पियुष ताडे याची प्रकृती स्थिर असून वैद्यकीय अधिकारी प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलिस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर नातेवाइकांनी रुग्णालयात धाव घेतली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now