सरकारी बँकेत नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी खुशखबर आहे भारतीय स्टेट बँकेत तब्बल 8283 जागांसाठी मेगाभरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. ही पदभरती लिपिक पदासाठी होणार असून यासाठी इच्छुक उमेदवाराने SBI ची अधिकृत साइट sbi.co.in ला भेट द्यावी लागेल. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2023 आहे.
एकूण 8238 जागा उपलब्ध असून ज्यामध्ये 3515 सामान्यांसाठी, 1284 अनुसूचित जातींसाठी, 748 अनुसूचित जमातीसाठी, 1919 OBC साठी आणि 817 EWS साठी राखीव आहेत. SBI Clerk Bharti 2023
पदाचे नाव: ज्युनियर असोसिएट (लिपिक) (कस्टमर सपोर्ट & सेल्स)
शैक्षणिक पात्रता:
पदवी उत्तीर्ण उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. तसेच, जे विद्यार्थी अंतिम वर्षात आहेत ते देखील अर्ज करण्यास पात्र आहेत. याशिवाय उमेदवारांचे वय 20 ते 28 वर्षे असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेतही सवलत दिली जाईल.
अर्ज फी
या भरतीसाठी उमेदवाराला खुल्या प्रवर्गासाठी 750 रुपये तर आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शुल्क भरण्यात सूट देण्यात आली आहे.
किती पगार मिळेल
पगार – रु.17900-1000/3-20900-1230/3-24590-1490/4-30550-1730/7-42600-3270/1-45930-1990/1-47920.
सुरुवातीचे मूळ वेतन रु.19900/- आहे (रु.17900/- तसेच पदवीधरांना दोन आगाऊ वाढीव स्वीकार्य)
निवड प्रक्रिया कशी असेल?
या पदांसाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया विविध टप्प्यात होणाऱ्या परीक्षेवर आधारित असू शकते. या अंतर्गत जानेवारी, २०२४ मध्ये लिखीत स्वरुपातील परीक्षा (Exam) होऊ शकते. तर मुख्य परीक्षा ही फेब्रुवारी महिन्यात होईल. अधिक माहितीसाठी अधिकृत साइटला भेट द्या.