रखवालदाराची हत्या करणाऱ्या दोघांच्या मध्यप्रदेशातून मुसक्या आवळल्या

नोव्हेंबर 16, 2023 4:49 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ नोव्हेंबर २०२३ । जळगाव तालुक्यातील म्हसावद ते वावडदा शिवारात अज्ञात दरोडेखोरांनी रखवालदाराचा खून करून ट्रॅक्टर पळवून नेल्याची घटना १५ नोव्हेंबर रोजी सकाळी उघडकीस आली होती. दरम्यान, याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन संशयित आरोपींच्या मध्यप्रदेशातून मुसक्या आवळल्या आहे. पवन बहादीर बारेला (वय-३०) रा. बाघाड ता. राजापूर जि. बडवाणी आणि बावरसिंग शोभाराम बारेला (वय-२८) रा. सालीकल ता. राजापूर जि.बडवाणी मध्यप्रदेश अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

news2 jpg webp

नेमकी काय होती घटना?
जळगाव तालुक्यातील बिलवाडी येथीलच रहिवासी ईश्वर मन्साराम पाटील यांचे वावडदा ते म्हसावद दरम्यान असणाऱ्या शेतामध्ये पांडूरंग पंडीत पाटील हे झोपण्यासाठी गेले होते. मंगळवारी १४ नोव्हेंबर रोजीच्या मध्यरात्री दोन्ही संशयित आरोपी पवन बहादीर बारेला व बावरसिंग शोभाराम बारेला हे दोघे शेतात आले. त्यावेळी शेतातून ट्रॅक्टर चोरी करण्यासाठी आले होते. त्यावेळी झोपलेले पांडूरंग पंडीत पाटील हे जागे झाली. त्यांनी ट्रॅक्टर चोरीला विरोध केला होता. त्यावेळी पवन बारेला आणि बाबवसिंग बारेला या दोघांनी लोखंडी डाबर पांडूरंग पाटील याच्या डोक्यात टाकून खून केला. त्यानंतर ते ट्रॅक्टर घेवून पसार झाले. दरम्यान, चोरी केले ट्रॅक्टर देखील रस्त्याने बंद पडले. त्यामुळे दोघेजण दुचाकीने पसार झाले. या खूनाबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्यासह त्यांच्या पथकाने सीसीटीव्हीच्या आधारे मध्यप्रदेशातून पवन बहादीर बारेला आणि बावरसिंग शोभाराम बारेला या दोघांना अटक केली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now