जळगाव लाईव्ह न्यूज । २३ मे २०२१ । मुक्ताईनगर तहसील कार्यालयात संजय गांधी योजनेंतर्गत वृद्धापकाळ योजना व राष्ट्रीय कुटुंब कल्याण योजना अशा विविध योजनांचा आढावा घेत प्रस्तावित प्रकरणे मंजूर करण्यासह दाखल असलेली प्रकरणे तत्काळ मार्गी लावण्याच्या सूचना आमदार चंद्रकांत पाटील यांनी केल्या.
तसेच कोरोना संदर्भात विविध उपाययोजना व नियमावलींचे पालन करण्यासंदर्भात गर्दी होणार नाही व मुक्ताईनगर, कुर्हा व अंतुर्ली येथील कोविड केअर सेंटरवर विलगीकरणाची स्वतंत्र व्यवस्था असल्याने त्या ठिकाणी क्वारंटाईन होत योग्य ती उपचार प्रणालीद्वारे आजारातून मुक्तता करून घ्यावी यासाठी प्रशासनाने तालुक्यातील शेवटच्या घरापर्यंत पोहोचून जनजागृती करावी अशा विविध सूचना बैठकीत करण्यात आल्या.
यांची होती उपस्थिती
प्रसंगी तहसीलदार श्वेता संचेती, नायब तहसीलदार प्रदीप झांबरे, गटविकास अधिकारी संतोष नागतीळक, पोलिस निरीक्षक रामकृष्ण पवार, शिवसेना तालुकाप्रमुख छोटु भोई, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील पाटील उपस्थित होते.