चालत्या बसमध्ये विद्यार्थिनींची छेडखानी ; पोलीसांकडे बस नेताच टवाळखोराने मारली बसमधून उडी

नोव्हेंबर 3, 2023 11:23 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ नोव्हेंबर २०२३ । जिल्ह्यात आधीच गुन्हेगारी वाढली असल्याचं दिसत असून त्यात टवाळखोरांनी हैदोस घातला आहे. अशातच नांदगाव-नांद्रा बसमध्ये एका टवाळखोराने विद्यार्थिनींची छेड काढल्याचा प्रकार घडला असून यावेळी बस थेट पोलीसांकडे नेत असल्याचे कळल्यावर टवाळखोर युवक आव्हाणे फाट्याजवळ बसमधून उडी मारून पसार झाला. याबाबत टवाळखोराविरोधात तालुका पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली आहे.

bs s jpg webp

नेमकी काय आहे घटना?
शहरातीलन नवीन बसस्थानकाहून (एम.एच.८०,वाय ५१९३) जळगाव-नांदगाव ही बस गुरुवारी १.३० वाजता निघाली. दुपारची १२.३० वाजेची बस न गेल्यामुळे या बसमध्ये नांदगाव, कानळदा, नांद्रा, फेसर्डी या भागातील विद्यार्थी-विद्यार्थिनींची संख्या मोठ्या प्रमाणात होती. तर इतर प्रवाशांचीही संख्या मोठी असल्याने बस खच्चून भरली होती.

बस आव्हाणे फाट्याच्या पुढे गेल्यानंतर बसमधील एका टवाळखोराने इतरांच्या साथीने बसमधील विद्यार्थिनींची छेड काढण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थिनींनी वाहकाकडे तक्रार केल्यानंतर वाहक लोटन पाटील यांनी संबधित टवाळखोराला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही संबधित टवाळखोराकडून बसमध्ये गोंधळ घालून, विद्यार्थिनींसमोर चित्र-विचित्र हावभाव करून छेडखानी करण्याचा प्रयत्न सुरु होताच. त्यानंतर बस नांद्रा फाट्यावर आली असताना, विद्यार्थिनींना होणारा त्रास वाढल्याने, वाहक लोटन पाटील यांनी चालक तुकाराम रायसिंग यांना बस थेट तालुका पोलीस स्टेशनमध्ये नेण्याच्या सूचना दिल्या.

यामुळे पोलीसांच्या भितीने घाबरलेल्या टवाळखोर युवकाने बस थांबविण्याची विनंती केली. मात्र, चालकाने बस न थांबवता, तालुका पोलीस स्टेशनकडे नेली. बस थांबणार नाही, हे कळल्यामुळे संबधित युवकाने पोलीसांकडे नाव सांगणाऱ्यांना थेट चॉपर दाखवून धमकी दिली. त्यातच आव्हाणे फाट्याजवळ युवकाने चालत्या बसचा दरवाजा उघडून उडी मारून, त्याठिकाणाहून पसार झाला. मात्र, चालकाने तरीही बस तालुका पोलीस स्टेशनला आणली. या प्रकरणी विद्यार्थी, चालकाने दिलेल्या फिर्यादीनुसार त्या युवकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोखंडे करत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now