गावठी पिस्तूल घेवून फिरणारा संशयित जेरबंद ; जळगाव शहर पोलिसांची कामगिरी

ऑक्टोबर 30, 2023 5:16 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑक्टोबर २०२३ । जळगावात गावठी पिस्तूल व दोन जीवंत काडतूस घेवून फिरणाऱ्या संशयिताच्या जळगाव शहर पोलिसांनी मुसक्या आवळल्या. यशवंत नामदेव पाटील (४७, रा. शिवाजीनगर, हुडको) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव असून याबाबत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

pistol gavthi katta

याबाबत असे कि शिवाजीनगर हुडको परिसरात एक जण गावठी कट्टा घेऊन फिरत असल्याची माहिती रविवारी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिल भवारी यांना मिळाली. त्यावरून त्यांनी कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार दुपारी ४ वाजता पोहेकॉ उमेश भांडारकर, पोकॉ तेजस मराठे, योगेश इंधाटे, अमोल ठाकूर हे तेथे पोहचले असता. त्या ठिकाणी यशवंत पाटील हा मद्याच्या नशेत गावठी कट्टा घेऊन फिरत असल्याचे आढळून आले.

त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे दोन जीवंत काडतूसदेखील सापडले. कट्टा व काडतूस जप्त करून या इसमाला अटक करण्यात आली. या प्रकरणी पोकॉ योगेश इंधाटे यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ उमेश भांडारकर करीत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now