25 हजाराची लाच घेताना महावितरणचा वरीष्ठ तंत्रज्ञ जाळ्यात

ऑक्टोबर 18, 2023 8:34 PM

जळगाव लाईव्ह न्यूज : 18 ऑक्टोबर 2023 : लाचखोरीचे प्रमाण काही कमी होताना दिसत नसून याच दरम्यान महावितरणचा वरीष्ठ तंत्रज्ञ लाच घेताना जाळ्यात अडकला आहे.संतोष भागवत प्रजापती (वय-३२) असं लाचखोराचे नाव असून जुने मीटर काढून नवीन मीटर बसविण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच मागितली होती. ती स्वीकारताना जळगाव लाचलुचपत विभागाने रंगेहात अटक केली. या कारवाईने खळबळ उडाली.

lach jpg webp

नेमकं प्रकरण काय?
जळगाव शहरातील एका भागात राहणारे तक्रारदार यांच्या घरी त्यांच्या आईच्या नावाने महावितरण कंपनीचे ईलक्ट्रीक मिटर आहे. दरम्यान त्यांचे मीटर जुने व नादुरूस्त असल्याने नवीन बसविण्यासाठी वरीष्ठ तंत्रज्ञ संतोष प्रजापती यांनी २५ हजार रूपये द्यावे लागतील अशी मागणी केली.

त्यानुसार तक्रारदार यांनी जळगाव लाचलुचपत विभागाकडे याबाबत तक्रार केली. त्यानुसार बुधवारी १८ ऑक्टोबर रोजी दुपारी पथकाना सापळा रचून वरीष्ठ तंत्रज्ञ संतोष प्रजापती याला २५ हजारांची लाच घेतांना रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now