⁠ 
बुधवार, ऑक्टोबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | खुशखबर : जिल्ह्याला कोविशिल्डचे १६ हजार डोस मिळाले

खुशखबर : जिल्ह्याला कोविशिल्डचे १६ हजार डोस मिळाले

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मे २०२१। जळगाव जिल्ह्यात मागील काही दिवसापूर्वी कोविशिल्ड लसीचा तुटवडा जाणवू लागला होता. यामुळे जिल्ह्यातील बरेच केंद्र बंद पडले होते.  मात्र शुक्रवारी दुपारी कोविशिल्ड लसीचे १६ हजार डोस प्राप्त झाले आहेत.

डोस प्राप्त झाल्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांनी जि. प. अध्यक्ष रंजना पाटील यांच्यासोबत याबाबत चर्चा केल्यानंतर या डोसच्या नियोजनानुसार केंद्रांना वाटप करण्यात आले आहे. यातील १२०० डोस हे जळगाव शहरातील केंद्रांना वाटप करण्यात आले आहेत. तर सर्वाधिक ११ हजार डोस हे प्राथमिक आरोग्य केंद्रांना वाटप करण्यात आले आहे.

लसीकरणाचा वेग व प्रतिसाद बघता दोन दिवसांपर्यंत हा साठा पुरेल. कोविशिल्ड लसीच्या दुसऱ्या डोसला प्राधान्य देण्यात येत असून, त्यानंतर उपलब्धतेनुसार पहिला डोस असे नियाेजन केंद्रांवर केले जात आहे. ग्रामीण भागात लोकसंख्येनुसार लसींचे वाटप व्हावे, अशी मागणी नुकतीच स्थायी समितीच्या सभेत उपस्थित करण्यात आली होती. त्यानुसार ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांना लसींचा अधिक पुरवठा केला जात आहे.

अश्या प्रकारे होणार वाटप?

– सर्व आरोग्य केंद्र : ११६००, रेडक्रॉस, राेटरी भवन : ६००, मनपा रुग्णालय : ६००, भुसावळ हॉस्पिटल ४००, ग्रामीण रुग्णालय यावल, पाचोरा, वरणगाव, बद्री रोड भुसावळ प्रत्येकी २००, ग्रामीण रुग्णालय अमळनेर, अमळगाव, भडगाव, भुसावळ, बोदवड, चाळीसगाव, मेहुणबारे, धरणगाव, एरंडोल, पहूर, पिंपळगाव, पारोळा, पाल, सावदा, न्हावी या ठिकाणी प्रत्येकी १००उपजिल्हा रुग्णालय मुक्ताईनगर, चोपड, अर्बन पीएचसी अमळनेर, भुसावळ प्रत्येकी १००.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.