जळगाव लाईव्ह न्यूज । २१ मे २०२१ । राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते संजय गरुड यांनी वृत्तपत्राच्या बातमीच्या माध्यमातून जामनेर तालुका साठी मोठ्या प्रमाणावर निधी आणला आहे असे सांगितले मात्र ही कामे आमदार गिरीश महाजन यांच्या कार्यकाळात मंजूर होऊन बरीच कामे झालेली आहे त्यामुळे जुनी कामे असल्याचा माहिती पत्रकार परिषदेद्वारे भाजपा तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांनी दिली यावेळी तालुका एज्युकेशन जितेंद्र पाटील भाजपा शहराध्यक्ष नफा गटनेते डॉक्टर प्रशांत भोंडे नगरसेवक महेंद्र बाविस्कर सरचिटणीस रवींद्र झाल्टे आनंदा लावरे वासुदेव घोंगडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
गेल्या दोन दिवसापूर्वी राष्ट्रवादी नेते संजय करून यांनी पत्रकारांना बातमी दिली होती त्यामध्ये सदर मंत्रालयात जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य माजी जिल्हा परिषद सदस्य संजय गरुड यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याशी भेट घेऊन जलसंपदा विभागाच्या अर्थसंकल्पात जामनेर तालुक्यातील सर्वाधिक कामे मंजूर झाल्याचा उल्लेख वृत्तपत्रातील बातम्या झाला. त्यामध्ये जामनेर तालुक्यातील पिंपळगाव बुद्रुक येथे वाघूर नदी व पूर संरक्षण भिंत बांधणे शेंदुर्णी येथे सोनवद नदीवर कांचीपुरम मशिदीच्या उजव्या बाजूला पूर संरक्षक भिंत बांधणे वाकोद येथे स्मशानभूमीजवळ पूर संरक्षक भिंत बांधणे वापरते. ते मदरसा जवळ पूर संरक्षक भिंत बांधणे वाकोद येथे मेवाती दफनभूमी जवळ पूर संरक्षक भिंत बांधणे वाकोद येथे शेख आरिफ यांच्या घराजवळ पूर संरक्षक भिंत बांधणे वाकोद शादीखाना मैदानाजवळ पूर संरक्षक भिंत बांधणे वाकोद येथे भिल्ल वस्ती जवळ निगडी रस्ता जवळ व विकास देशमुख यांच्या वाड्यात जवळ पूर संरक्षक भिंत बांधणे येते.
मारुती मंदिरा वरील बाजूस पूर संरक्षक भिंत बांधणे नाचण खेडा येथे लोकवस्ती व बाजारपेठ जवळ संरक्षक भिंत बांधणे नाचणखेडा येथे दत्त मंदिर जवळ संरक्षक भिंत बांधणे ही कामे चालू वर्षाच्या अर्थ संकल्प मंजूर केल्याचे संजय गरुड यांनी वृत्तपत्रात बातम्या प्रसारित केल्या आहेत मात्र दुसरीकडे ही सर्व कामे माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या कारकिर्दीत दोन ते तीन वर्षापासून मंजूर झाले असून या कामातील सुमारे 80 टक्के कामे पूर्ण झाले आहे तर काही काम प्रगतीपथावर आहे असे असताना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते संजय गरुड यांनी वृत्तपत्राच्या माध्यमातून खोटी माहिती जामनेर तालुक्याला दिली व जनतेची दिशाभूल केली आहे त्यामुळे संजय गरुड यांनी जुन्या कामाचे माहिती देऊन श्रेय घेण्यापेक्षा आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सत्तेत आहे त्यामुळे त्यांनी त्यांचा वजनाचा वापर करून जामनेर तालुक्यात अतिरिक्त निधी आणावा व कामे मंजूर करावी असा आरोप भाजपा तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांनी पत्रकार परिषदेत केला आहे