Bhusawal Crime : नवऱ्याची दारू पत्नी पिऊन गेली, रागाच्या भरात पत्नीने जे केलं ते भयंकर…

सप्टेंबर 19, 2023 12:37 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ सप्टेंबर २०२३ । भुसावळ तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. पतीने दोघांसाठी दारु पत्नी एकटीच पियुन गेली. या गोष्टीचा राग येऊन पतीने पत्नीला लाथा बुक्याने मारहाण करून तीचा गळा दाबून ठार केल्याची घटना समोर आलीय. शांती देवी (३६) असे मृत महिलेचे नाव असून जितेंद्र गंगाराम हेमराम (२५, रा. युपी) असे आरोपी पतीचे नाव आहे.

hatnur crime nws jpg webp

नेमकी काय आहे घटना?
हतनूर येथील वाढीव दरवाजाचे काम गेल्या काही वर्षापासून सुरू आहे. या ठिकाणी परराज्यातील मजूर कामासाठी रहिवास करीत आहे. यापैकी जितेंद्र हेमब्रम व शांतीदेवी जितेंद्र हेमब्रम हे दोघे देखील या ठिकाणी मजुरीचे काम करतात. दोन्ही पती पत्नीला दारूचे व्यसन होते. असेच दि १७ रविवार रोजी दुपारच्या वेळी पतीने दोघांसाठी दारु आणली होती मात्र, सायंकाळच्या जेवणाच्या आधीच पत्नी शांतीदेवीने दारू एकटीने संपविली, थोड्या वेळाने पती जितेंद्र घरी येऊन घरातील दारू हुडकत होता त्याला दारू न सापडल्याने, त्याने पत्नीला माझ्या वाटेची दारू कुठे आहे असे विचारले असता ती मी प्यायल्याचे सांगताच पतीने पत्नीला रागाच्या भरात लाथा बुक्याने मारहाण करून तीचा गळा दाबून ठार केले.

त्यानंतर पती घरात बसून होता मात्र बराच वेळ झाला तरी यांचा आवाज का येत नाही म्हणून शेजारी त्यांच्या घरा जवळ येऊन विचारपुस करताच, पती जितेंद्र याने माझी पत्नी उठत का नाही, तिला बघा त्यांनी सागीतल्या नंतर शेजाऱ्यांनी तिला उपचारासाठी वरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरानी तपासणी करुन तिला मृत घोषित केले. याप्रकरणी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास सह पोलीस निरिक्षक आशिष आडसुड हे करीत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now