जळगाव लाईव्ह न्यूज । २१ मे २०२१ । जळगाव जिल्ह्यात काेराेनाची दुसरी लाट सुरु आहे. तसेच यावेळी कोरोनाचा स्ट्रेन अधिक धोकेदायक व पूर्वीपेक्षा वेगळा असल्याच्या वैद्यकीय तज्ञांचा अंदाज आहे. या लाटेतील स्ट्रेन काेणता आहे. हे तपासण्यासाठी येत्या २५ ते २८ तारखेला जिल्ह्यातील १०० बाधितांचे नमुने दिल्ली येथील प्रयाेगशाळेकडे पाठवण्यात येणार आहे.
जळगाव जिल्ह्यासह राज्यातील काेराेनाचा संसर्ग वाढल्याने काेराेना विषाणूच्या जनुकात काही बदल झाला आहे का? त्यानुसार उपचारात काही बदल करणे आवश्यक आहे का? याबाबत धाेरण ठरवण्यासाठी भारतीय वैद्यक परिषदेतर्फे महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यातील काेराेना बाधितांचे गेल्या दाेन महिन्यातील नमुने २५ ते २८ मे दरम्यान संकलित करण्यात येणार आहे.
त्यासाठी गेल्या दाेन महिन्यातील नमुने प्रयाेगशाळेत उणे ८० अंश तापमानात साठवले जात आहेत. हे नमुने दिल्ली येथे पाठवण्यात येणार आहेत. दिल्लीतील प्रयाेगशाळेत त्याची तपासणी करून त्याबाबतचा अहवाल केंद्राला देण्यात येईल. ताे दखलपात्र गंभीर असल्यास त्याबाबत राज्य शासनाला कळवण्यात येणार आहे.