स्वयंपाक करण्याच्या वादातून पत्नीवर विळ्याने वार, पतीविरुद्ध गुन्हा दाखल

सप्टेंबर 10, 2023 4:17 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १० सप्टेंबर २०२३ । स्वयंपाक करण्याच्या वादातून पतीने पत्नीवर विळ्याने वार करून जखमी केल्याची धक्कादायक घटना जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात घडली. सुभाष शंकर उमाळे (वय-४०) असं आरोपी पतीचे नाव असून मंगला उमाळे असं जखमी पत्नीचे नाव आहे. दरम्यान, याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime 2 jpg webp

काय आहे घटना?
शहरातील रामेश्वर कॉलनी राहणाऱ्या सुभाष शंकर उमाळे हे पत्नी आपल्या पत्नी मंगला उमाळे यांच्यासोबत वस्तव्याला आहे शुक्रवारी ८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता मंगला उमाळे या महिला कामावरून घरी आल्यावेळी तिचे पती सुभाष उमाळे याने स्वयंपाक करण्यास सांगितला. दरम्यान मी आता कामावरून आली आहे. थोड्यावेळाने स्वयंपाक करते असे पत्नी मंगला यांनी सांगितले.

याचा राग आल्याने सुभाष उमाळे याने हाता विळा घेवून पत्नी मंगला यांच्या उजव्या कानावर वार करत जखमी केले. हा प्रकार घडल्यानंतर मंगला उमाळे यांना शेजारी राहणाऱ्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. याप्रकरणी रात्री उशीरा एमआयडीसी पोलीस ठाण्यात पती सुभाष शंकर उमाळे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक पंकज पाटील करीत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now