जळगाव लाईव्ह न्यूज । ६ सप्टेंबर २०२३ । मागील गेल्या काही दिवसापासून सोने (Gold Rate) आणि चांदीच्या (Silver Rate) किमतीत सातत्याने बदल होत आहे. कधी महाग तर कधी स्वस्त होत आहे. यामुळे ग्राहकही संभ्रमात आहेत. यातच आता सणासुदीच्या काळात दोन्ही धातूंचे दर घसरणार की वाढणार याकडे ग्राहकांचे लक्ष लागून आहेत. या महिन्याच्या सुरुवातीच्या दोन दिवसांत सोन्याने चांगली आघाडी घेतली. सहाव्या दिवशी सोन्याने माघार घेतली असून किंमतीत किंचित घसरण झाली. दुसरीकडे चांदीला या महिन्यात मोठा पल्ला गाठता आलेला नाही.. Gold Silver Rate Today
16 ऑगस्टनंतर चांदीने मोठी भरारी घेतली होती. चांदीत जवळपास 4000 रुपयांची वाढ नोंदविण्यात आली होती. त्यानंतर चांदीत सातत्याने घसरण सुरु आहे. आता तर चांदीच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. सोने-चांदीतील घसरणीचा फायदा ग्राहकांना होणार आहे. त्यांना स्वस्तात खरेदीची संधी चालून आली आहे.
आताचे काय आहेत दर?
22 कॅरेट सोने 55,300 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,3100 रुपये प्रति 10 ग्रॅमवर विकला जात आहे. दुसरीकडे चांदीचा प्रति किलोचा दर 74,500 रुपये आहे.
गुडरिटर्न्सनुसार, ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या सत्रात सोने 600 रुपयांनी वधारले होते. सप्टेंबर महिन्यात तेजीचे सत्र सुरु होते. 1 सप्टेंबरला भाव घसरले. तर 2 सप्टेंबरला 150 रुपयांची वाढ झाली. 3 तारखेला भावात बदल झाला नाही. 4 सप्टेंबर रोजी भाव 100 रुपयांनी वधारले. पण 5 सप्टेंबर रोजी किंमतींना ब्रेक लागला. दुसरीकडे 1 सप्टेंबर रोजी चांदीत 500 रुपयांची तर 2 सप्टेंबर रोजी चांदीत 200 रुपयांची घसरण झाली. 4 सप्टेंबर रोजी चांदीत किलोमागे 700 रुपयांची घसरण झाली. घसरणीचे हे सत्र पाचव्या दिवशी कायम होते. 5 सप्टेंबर रोजी चांदीत 1000 रुपयांची घसरण झाली.
जळगाव सुवर्णनगरीमधील दर
जळगाव सुवर्णनगरीत सध्या 22 कॅरेट सोन्याचा दर विनाजीएटी 54,800 रुपयावर गेला आहे. तर दुसरीकडे 24 कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी 60,100 रुपायांवर आहे. त्याचप्रमाणे एक किलो चांदीचा दर विनाजीएसटी 74,000 रुपयांवर गेला आहे.